न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२०) :- करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरतील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
इमारती, गटारे, रस्ते, नाले, पूल व प्रकल्प, उद्याने अशा स्थापत्य विभागातील आठ क्षेत्रीय कार्यालये, बीआरटीएस, स्थापत्य उद्यान, पर्यावरण, पाणीपुरवठा, जलनिसारण विभागातील अशी १०५ कामे तातडीने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.















