न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- जनअधिकार संघटना यांच्या विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, शेंगदाणे, मीठ आदी वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे. एका कुटुंबास ३० दिवस पुरेल इतके अन्नधान्य आहे.
भोसरी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आदी परिसरात गरजवंतांना किटचे वाटप करण्यात येत आहे. जनअधिकार संघटना अध्यक्ष मजीद शेख, अॅड. वाजिद खान, महिलाध्यक्षा सईदा शेख, करीमुद्दीन खान, विजय शिंदे हबीब शेख ग्लोबल ग्रुप उद्योजक शैलेश चौहान आदी दानशूर व्यक्तींच्या सहयोगाने हे सत्कार्य सुरू केले आहे.
पुणे शहर भागातील गरजू कुटुंबांची यादी करून या वस्तूंचे वाटप केले जात आहे. झोपडपट्टी, मजूर कुटुंबांना अधिक प्राधान्य देण्यात आले.















