न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- पिंपरी चिंचवडमधील कासारवाडीतील माजी नगरसेवक सोपानराव लोंढे यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. ते दोन टर्म महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
त्यांनी शिक्षण मंडळाचे उपसभापतीपदही भूषविले आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज, बुधवारी कासारवाडी येथे झाला.















