न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) : सध्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, रक्तदाब, ह्रदय विकार, श्वसनाशी संबंधित आजार, किडनीचे आजार असलेले रुग्ण, गरोदर स्त्रिया, मधुमेहग्रस्त रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग व अपाय होण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने अशा सर्व नागरिकांची प्राधान्याने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स व गरोदर महिलांना गरोदरपणात लोह व कॅल्शियमयुक्त गोळ्या नियमितपणे देणे आवश्यक असलेने महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यांमधून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संबंधितांना वरील गोळ्या मोफत देण्यात याव्यात, अशी मागणी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.















