आज सकाळ व दुपारच्या सत्रात मिळून तब्बल १२ जणांना कोरोनाची बाधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी द्पारी हाती आलेल्या अहवालानुसार सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात दोन पुरुषांचा आणि पाच महिलांचा समावेश आहे. पुरुषांची वयं अनुक्रमे २३ आणि ४५ वर्षे असून, महिलांचे वयं १२,२७,३२,३२,३१ वर्षे अशी आहेत.
हे रुग्ण चिंचवड स्टेशन आणि दिघी परिसरातील रहिवाशी आहेत. दरम्यान शहरात सकारात्मक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५२ वर पोहोचली असून, मनपाच्या रुग्णालयात ८७ रुग्ण उपचार घेत असून, शहरातील सात जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत शहरातील १४२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळीच पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज दुपारी सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आज सकाळ व दुपारच्या सत्रात मिळून तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.















