न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्याच्या चौकीत एका आरोपीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. दोन भावंडाचा घरगुती वाद पोलीस चौकीपर्यंत पोहचला. तेव्हा एकाची अदखलपात्र तक्रार घेण्यात आली तर दुसऱ्याला नोटीस बजावत समजूत काढून घरी पाठवून देण्यात आले.
यापैकी, एकाला सर्दी आणि खोकला झाल्याने, तो औंध येथील जिल्हा रुग्णालयात गेला असता त्याला करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. ही माहिती समजताच या संबंधित पोलीस चौकीतील ५ जण क्वारंटाइन झाले आहेत. आजपर्यंत पोलीस आयुक्तालयातील ७ जण करोनाबाधित आढळलेले आहेत. यापैकी, एका अधिकाऱ्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.















