- संभाजीनगर, आळंदीरोड, आनंदनगर, बोध्दनगर, रुपीनगर व वाकड परिसरातील ३८ रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दिवसभरात १५ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात ११ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील चिंचोली, परंदवाडी, पाईट या परिसरातील तीन जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. नव्याने आढळलेले बाधित रुग्ण हे बौध्दनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर, दापोडी या परिसरातील रहिवासी असून त्यांच्यासह २२२ रुग्णांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील करोना बाधितांनी पाचशेचा आकडा ओलांडला असून एकूण संख्या ५११ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत २४९ जणांना घरी सोडण्यात आले असून सर्व जण ठणठणीत बरे झालेले आहेत.
आज संभाजीनगर, आळंदीरोड, आनंदनगर, बोध्दनगर, रुपीनगर व वाकड येथील रहिवासी असलेले कोविड-१९ बाधित ३८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.


















