न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर कै. भिकु वाघेरे पाटील यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे पिंपरी येथील पूर्णाकृती पुतळ्यास महापौर श्रीम. उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष आण्णा लोंढे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसदस्य राजू मिसाळ, नगरसदस्या उषा वाघेरे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य नंदकुमार सातुर्डेकर,महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते.


















