न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठाण व शिवसेना शाखा ताम्हाणे वस्ती यांच्या वतीने कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे वाटप करण्यात आले. यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
शिवसेना शाखाप्रमुख कु. प्रविण धोंडाप्पा पाटील यांच्या वतीने काढा वाटपाचे आयोजन करण्यात आले. यासाठी कार्तिक टोणपे, विकास काटे, नागेश खांडेकर, श्रीकांत प्रजापती, सौरव मोरे आदींनी परीश्रम घेतले.


















