न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२०) :- गणसंख्येअभावी सोमवारी पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधि समितीची पाक्षिक सभा तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने भरती केलेल्या १०३ डॉक्टरांना कायम करण्यासाठीचा महत्वपूर्ण विषय लांबणीवर पडला आहे.
सलग तिस-यावेळी विधि समितीची सभा तहकूब करण्यात आली आहे. सभेसाठी केवळ समितीच्या सभापती अश्विनी बोबडे उपस्थित होत्या. विधी समितीचा कार्यकाळ १४ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे ही तहकूब सभा आता १२ जून रोजी ठेवली असल्याचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.














