न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजप उपाध्यक्ष तथा उद्योजक दीपक मोढवे (पाटील) यांनी लॉकडाऊनमध्ये माणुसकीची भावना जपत, दहिगाव साकतमध्ये पारधी समाजाच्या गोरगरीब लोकांना १० क्विंटल गव्हाचे नुकतेच वाटप केले.
दीपक मोढवे (पाटील) म्हणाले की, लॉकडाऊनमुळे गावाकडे हातावर पोट असणारे गोरगरीब, कष्टकरी यांची दैना झाली आहे. कोरोनामुळे पारधी या भटक्या समाजाच्या लोकांच्या जनजीवनावर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. हाताला काम नाही, पगार नाही, अशा कालावधीमध्ये त्यांना जीवन जगता यावे, म्हणून पुढाकार घेत त्यांना गव्हाचे वाटप केले. यामुळे काही दिवस तरी, या लोकांना त्याचा फायदा होणार आहे.
गावातील पारधी समाजाच्या लोकांनी मोढवे पाटील यांच्या मदतीबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.


















