न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाच क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ७१ धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३ इमारती या अतिधोकादायक आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ६३ धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील ४१ इमारती या नागरिकांना स्वत : पाडल्या अथवा त्यांची दुरुस्ती करून घेतली आहे.
महापालिकेच्या ” अ ‘ , ” ड ‘ , ” इ , “ फ ‘ , ” ग ‘ या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण ७१ धोकादायक इमारती आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३९ धोकादायक इमारती ” ड ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. त्यांची किरकोळ दुरुस्ती करून घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
“ अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २, ” ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १ अतिधोकादायक इमारत आहे. अद्याप ३० धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही प्रलंबित आहे. ” ब ‘ , ” क ‘ आणि ” ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.