केरळ येथील पुर-परिस्थितीच्या पार्श्व-भुमीची जाणिव ठेऊन सोमनाथ तापकीर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. यावेळी काळेवाडी येथील तापकीर मळा चौक येथे, ओम साई रिक्षा संघटनेच्यावतीने वाढदिवसानिमित्त रिक्षाच्या माध्यमातुन एकदिवसीय मोफत प्रवासाचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिनीच रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी या मोफत रिक्षा सेवेला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मोफत रिक्षा सेवेचे उद्घाटन नारळ वाढवून करताना युवा नेते सोमनाथ तापकीर,तसेच सर्व रिक्षा चालक,मित्र परिवार आदी उपस्थित होते.
मोफत एकदिवसीय रिक्षा प्रवासाने युवा नेते सोमनाथ तापकीर यांचा वाढदिवस साधेपणाने व सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा.












