न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्याकडून लॉकडाऊन काळात केलेल्या विविध सामाजिक कार्याची पावती म्हणून नगरसेविका सविता खुळे व सामाजिक कार्यकर्ते नरेशआप्पा खुळे तसेच बळीराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब गरजू लोकांसाठी सलग २४ दिवस यशस्वीपणे अन्नछत्र चालविणे, रहाटणी प्रभागात सातत्याने सॅनिटायझर फवारणी करणे, गरजूंना अन्नधान्याचे वाटप करणे, केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सुमारे ३५०० विना राशनकार्ड धारकांना फॉर्म वाटप करणे अशी विविध सामाजिक कार्य नगरसेविका सविता खुळे व नरेशआप्पा खुळे यांनी केले. या सर्व कामाचे कौतुक आमदार महेशदादा लांडगे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सुनीता तापकीर, महाराष्ट्र चॅम्पियन पै. बाबा तांबे व ग्रामस्थ उपस्थित होते.