न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- पिंपळे निलख येथे रविवारी रात्री टोळक्याने धुडगूस घालत सात वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अवघ्या चार तासात ११ जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी सातजण अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. राजकुमार आरसन पिल्ले (वय २५, रा. शारदा कॉलनी, पिंपळे निलख) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कुणाल राजेंद्र सरतापे (वय २०), चेतन रामनवल साहानी (वय २२, दोघेही रा. कस्तुरबा गांधी वसाहत, बौध्द विहार, औंध), रोहन कुमार जोगदंड (वय २२), यशवंत सुनिल अवघडे (वय २१, दोघेही रा. इंदीरा वसाहत, आंबेडकर चौक, औंध) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवी पोलिसांसह या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पथक करीत होते. गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात ११ आरोपींना ताब्यात घेतले.















