- पिंपळे गुरव येथील ७८ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू…
- आज शहरातील ६१ कोविडबाधित रुग्णांना डिश्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. १५) रोजी ६५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात ३७ पुरुष व २८ महिलांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील खड़की व खेड येथील तीन पुरुषांना कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील पिंपळे गुरव येथील गुलमोहर कॉलनीतील एका ७८ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १२४६ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ४७२ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक पॉझिटीव्ह आलेले रुग्ण लक्ष्मीनगर वडमुखवाडी, गुलमोहर कॉलनी पिपळे गुरव, निगडी, नवभारतनगर दापोडी, बौध्दनगर पिंपरी, भिमाशंकर नगर दिघी, जयभीमनगर दापोडी, श्रीकृष्ण कॉलनी काळेवाडी, लिंबोरेवस्ती दापोडी, पवारवस्ती दापोडी, आदर्शनगर दिघी, साईबाबानगर चिंचवड, यमुनानगर, रमाबाईनगर पिंपरी, अजंठानगर, शाहूनगर, आनंदनगर, सद्गुरकॉलनी वाकड, सिदार्थनगर दापोडी, सखाराम काटेचाळ दापोडी, वाकड, कासारवाडी, मोरवाडी, पिंपरी कॉलनी वाघेरे पार्क येथील रहिवासी आहेत.
आज आनंदनगर, अजंठानगर, चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, नवभारतनगर दापोडी, नानेकरचाळ पिंपरी, जुनी सांगवी, रमाबाईनगर पिंपरी, गुरुदत्तनगर पिंपरी, लालटोपीनगर मोरवाडी, दापोडी, दिघी, दळवीनगर चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, यमुनानगर, भोसरी व सांगवी येथील ६१ कोविडबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ७३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


















