न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भक्ती शक्ती निगडी येथे १०७ मी.उंचीचा वैशिष्ठयपूर्ण राष्ट्रीय ध्वज स्मारक (Monumental Flag) उभारणेत आलेला आहे. दि:- ०६/०९/२०१८ रोजीच्या म.न.पा. ने घेतलेल्या निर्णयानुसार प्रतिवर्ष ०१ ऑक्टोबर ते ३१ मे या ८ महिने कालावधीमधे ध्वज फडकविण्यास मान्यता देणेत आलेली आहे.
तथापी दि: १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाळा असल्याने तसेच हवेचा उच्चदाब व प्रवाह यामुळे राष्ट्रध्वज वारंवार खराब होत असल्या कारणाने सदर कालावधीत हा राष्ट्रध्वज न फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर जाहीर निवेदनानुसार सर्व नागरिकांना कळविणेत येते कि दि: १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १५ ऑगस्ट वगळून सदर वैशिष्ट्यपूर्ण राष्ट्रीय ध्वज स्मारक ( Monumental Flag) फडकाविणेत येणार नाही, असे मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


















