- चिंचवड विधानसभेतील नगरसेविकेसह आठ जणांना बाधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19 जून 2020 ) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील आठ जणांनाही बाधा झाली आहे. त्याचे रिपोर्ट (गुरुवारी) रात्री उशिरा आले आहेत. कोरोनाने महापालिकेत शिरकाव केला आहे.
दरम्यान, या नगरसेविकेच्या संपर्कात आलेल्या नगरसेविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दापोडीतील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका शिक्षण समितीच्या सदस्या असलेल्या या नगरसेविका चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आहेत.
शहरात गुरूवारी (दि.18) रोजी 101 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच गुरूवारी मृत झालेले रुग्ण गुलाबनगर दापोडी (पुरुष,वय ६५ वर्षे), दिघी (पुरुष,वय ४३ वर्षे), शिरपुर धुळे (पुरुष, वय-६६ वर्षे) येथील रहिवासी आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 1474 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 533 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 09 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
गुरूवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पिंपरी, हिंदचौक पिंपळे निलख, शिवतीर्थ काळेवाडी, मोरेवस्ती चिखली, मोरवाडी, खंडोबामाळ, तानाजीनगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, पिंपळे सौदागर, विद्यानगर चिंचवड, नवी सांगवी, पंचतारानगर आकुर्डी, भाटनगर, इंदिरानगर चिंचवड, आंबेडकरनगर पिंपरी , दत्तनगर चिंचवड , घरकुल चिखली , गांधीनगर पिंपरी , दापोडी , तुळजाभवानी कॉलनी थेरगाव , शिवशक्ती चौक भोसरी , वैभवनगर पिंपरी , नाशिक फाटा कासारवाडी , सोनगिरा विहार काळेवाडी , बौध्दनगर पिंपरी , जगताप डेअरी , बिजलीनगर चिंचवड , उद्यमनगर पिंपरी , तापकीर चौक काळेवाडी , सिध्दार्थनगर दापोडी , विनायकनगर पिंपळे गुरव , यमुनानगर , कोकणेनगर , गवळीमाथा भोसरी, संभाजीनगर चिंचवड, मिलिंदनगर पिंपरी, गणेशनगर थेरगाव, मोरेवस्ती चिखली येथील रहिवाशी आहेत.
आज नढेनगर काळेवाडी , रमाबाईनगर पिंपरी , बौध्दनगर पिंपरी , केशवनगर चिंचवड , शाहुनगर , चिंचवड स्टेशन , साईबाबानगर चिंचवड , अजंठानगर आकुर्डी , सिध्दार्थ नगर दापोडी , विजयनगर काळेवाडी , आनंदनगर , माऊली चौक वाकड , दत्तनगर दिघी , शिवतिर्थ नगर काळेवाडी , चिखली , दिघीरोड भोसरी , वाल्हेकरवाडी , भीमनगर पिंपरी , साईबाबा नगर चिंचवड , सदर्शन नगर , पिंपळे गुरव , गलाबनगर दापोडी, गांधिनगर खराळवाडी,धनगरबाबा मंदिर रहाटणी,पिंपरी, दत्तमंदिर वाकड,नाणेकरचाळ पिंपरी,पिंपळे सौदागर,काटेनगर दापोडी, बेलठिकानगर थेरगाव, एम बी कॅम्प किवळे येथील निगेटिव्ह रूग्णांना गुरूवारी रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.