न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19. जून. 2020):- पुण्यातील चांदणी चौकातील भुसारी परीसरात अज्ञात ईसमाने एका चार महिन्याच्या मुलीला सोडून पळ काढल्याची बातमी वा-यासारखी पसरली होती. ही घटना गुरूवारी (दि. 18) रोजी सायं. पाच वाजता घडली होती.
बघ्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनला माहीती दिली. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारी 12.00 वा. स्वतःहून त्या मुलीचे आई-वडील कोथरूड पोलिस चौकीत दाखल झाले.
त्या मुलीच्या आईचे नांव लक्ष्मी तुकाराम क्षिरसागर असे आहे. मुलगी चार महीन्याची असून अद्याप तीचे नामकरण केलेले नाही. कोथरूड पोलिस पुढील तपास करीत आहेत.