न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19. जून. 2020) :- शहर पोलीस दलातील आणखी तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे . त्यामुळे कोरोनाबधित पोलिसांचा आकडा १३ झाला आहे.
त्यातील आठ पोलिसांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे . तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत . पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी – चिंचवड पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या आता १३ झाली आहे .
त्यातील आठ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून , ते कामावर रुजू देखील झाले आहेत . गुरुवारी एका पोलिसाचा तर शुक्रवारी सकाळी दोन पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .
शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे . त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन केले असून पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले . सध्या पाच पोलिसांवर पिंपरी – चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत .














