- स्वि. नगरसदस्य यादव यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 21. जून 2020) :- करोनाच्या विषाणुमुळे सर्वच कष्टकरी वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत. यामधून रिक्षाचालकांचे कुटूंबदेखील सुटले नाहीत. त्यांच्यापुढे देखील रोजगाराची मोठी समस्या पुढे उभी राहिली आहे. त्यामुळे कुटूंबाचा उदारनिर्वाह कसा करायचा हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. हे पाहुनच जमेल तशी मदत करण्याची भावना मनामध्ये ठेवून प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी कुदळवाडीमधील सुमारे दोनशे रिक्षा चालकांना धान्य व होमिओपॅथीक गोळ्याचे वाटप भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते केले.
यावेळी परिसरातील बहुसंख्येने नागरीक व रिक्षाचालक उपस्थित होते. यामुळे रिक्षाचालकामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दिनेश यादव म्हणाले की, कोरोनाचा प्रसार अदयापही सुरूच असून, त्यामुळे जनजीवन संपुर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच अजूनही लॉकडाऊन सुरुच आहे. त्यामुळे अपवाद वगळता बाजारपेठा बंदच आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार देखील बंद आहेत. अशामुळे त्याच्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. यापासून रिक्षा चालक देखील सुटले नाहीत. त्यांचे हातवर पोट असल्यामुळे करोना व लॉकाडाऊनमुळे प्रवाशी बाहेर पडण्याचे प्रमाण बंदच आहे. त्याचा फटका या रिक्षाचालकांना झाला असून त्यांचा रोजगार देखील बुडाला आहे. हे पाहुनच दिनेश यादव यांनी कुदळवाडी येथील दोनशे रिक्षाचालकांना गरजू अन्न-धान्य व होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व हास्ते केले आहे.


















