- भाटनगर आणी बोपखेल येथील दोन पुरूषांचा कोरोनामुळे मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 21. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. 21) रोजी 92 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 54 पुरूष आणि 38 महिलांचा समावेश आहे.
तसेच आज पिंपरीतील भाटनगर येथील 66 वर्षीय आणी बोपखेल येथील 55 वर्षीय पुरूषांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 1768 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 669 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह ) आलेले रुग्ण गांधीनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, आंबेडकरनगर पिंपरी, इंद्राणीनगर चिंचवड, रहाटणी, पिंपळे सौदागर, वैदुवस्ती, पवारनगर काळेवाडी फाटा, रिव्हररोड पिंपरी, चिंचवड, मोरेवस्ती चिखली, राजीवगांधी वसाहत नेहरूनगर, आनंदनगर चिंचवड, चिखली, लांडेवाडी भोसरी, शास्त्रीचौक भोसरी, थेरगांव, मोहननगर चिंचवड, यमुनानगर, जयभीमनगर दापोडी, जुनी सांगवी, वैष्णवदेवी मंदीर पिंपरी, किनारा हॉटेल दापोडी, धावडे आळी भोसरी, कोकणेनगर काळेवाडी, च-होली, नेहरुनगर, विशालनगर पिंपळेनिलख, देहू आळंदी रोड चिखली, आदर्शनगर दिघी, लालटोपीनगर मोरवाडी, खानदेश नगर मोशी, दिघीरोड भोसरी, संततुकारामनगर पिंपरी, बोपखेल, साधुवासवानी गार्डन पिंपरी, गणेशनगर पिंपरी, नलवडेचाळ नेहरूनगर, समर्थनगर नवी सांगवी, आदर्शनगर काळेवाडी, आनंदनगर जुनी सांगवी, शिवक्लासिक सोसायटी मोशी, विद्यानिकेतन स्कुल निगडी, बौध्दनगर पिंपरी, मिलिंदनगर पिंपरी, चिंचवड, डि मार्ट जवळ चिंचवड, ताम्हाणे वस्ती चिखली, भारतनगर दापोडी, महात्मा फुलेनगर पिंपरी, आळंदी, बोपोडी, देहूगांव, कोथरुड व हिंजवडी येथील रहिवासी आहेत.
आज मोरेवस्ती चिखली, अजंठानगर आकुर्डी, शाहूनगर चिंचवड, पिंपरी कॉलनी, वैभवनगर पिंपरी, केशवनगर चिंचवड, गवळीनगर भोसारी, साईबाबानबर चिंचवड, तापकिरनगर काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, रमाबाईनगर पिंपरी, आनंदनगर चिंचवड, नेहरुनगर, खडकी येथील रहिवासी असलेले रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान ०१ तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.