- कोरोना तपासणी स्वतंत्र लॅबसाठी प्रयत्न करणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23. जून. 2020) :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली .
शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली .
यावेळी महापौर माई ढोरे , भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे , आमदार लक्ष्मण जगताप , माजी खासदार अमर साबळे , स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे , सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके , उपमहापौर तुषार हिंगे , आयुक्त श्रावण हर्डीकर , आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे , माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार , नगरसेवक बाबू नायर , प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे , लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन , अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते .
देवेंद्र फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात आगमन झाले . त्यांनी शहरातील करोनाची परिस्थिती , महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतली . दरम्यान , फडणवीस यांचे आगमन होताच पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी गर्दी केली .
” पिंपरी चिंचवड शहरात ज्या पद्धतीने करोना नियंत्रणात आणण्यासाठी लढाई सुरु आहे. त्याला काही प्रमाणात यश येत आहे . प्रशासनाने नियोजन चांगले केले आहे . डॅशबोर्डच्या माध्यमातून चांगले काम करता येईल . गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत . पावसाळ्यात अजून वाढण्याची शक्यता आहे . त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील याबाबत आयुक्तांकडून माहिती घेतली आहे . स्वतंत्र लॅबची मागणी संदर्भात मी शासनाकडे तशी विनंती करेल, असे फडणविस यावेळी म्हणाले.