न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- पिंपरी – चिंचवड शहरात बेरोजगारीमुळे आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे .
पहिली घटना वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीसमोर घडली. विश्वभर केशव शिंदे ( वय 40 , रा . रमाबाईनगर , पिंपरी ) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शिंदे हे कामगार असून त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती . लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ते आर्थिक विवंचनेत होते . दरम्यान , त्यांनी सोमवारी रात्री वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहती समोरील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास एका पादचाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला .
दुसरी घटना पंचनाथ कॉलनी , काळेवाडी येथे घडली . या घटनेत अक्षय रामचंद्र बनसोडे ( वय 27 , रा . पंचनाथ कॉलनी , काळेवाडी ) या तरुणाने आत्महत्या केली . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अक्षय हा एका खासगी कंपनीत कामाला होता . मात्र , लॉकडाऊनमुळे दोन ते अडीच महिन्यांपासून तो घरीच होता . दरम्यान , सोमवारी रात्री त्याने साडीच्या सहाय्याने राहत्या घरातगळफास घेऊन आत्महत्या केली . मंगळवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना उधकीस आली . या दोन्ही घटनांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत .
तिसरी घटना निगडी येथील पीसीएमसी कॉलनीत घडली . एका अज्ञात इसमाने आत्महत्या केली आहे . आत्महत्या केलेला व्यक्ती हा लॉकडाऊनपूर्वी शहरात आला होता . दोन तरुणांसोबत तो राहण्यास होता . त्याच्याही हाताला काम नव्हते . मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास त्याने राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला . या इसमाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटवण्याचे काम सुरु होते . निगडी पोलीस तपास करीत आहेत .