न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- ठेकेदारांकडून बँक खात्यावर लाच घेणारे अधिकारी डॉ. अनिल रॉय, सुनील लोंढे व सुनील बेळगांवकर यांना निलंबित करा व ठेकेदाराला काळया यादीत टाका, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्याकडे पत्रादवारे केली आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ‘पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेवून वायसीएमच्या मशीन खरेदीमध्ये ५० लाखांचे मशीन दिड करोड रूपयांना खरेदी केले व या खरेदीत संबंधित अधिकारी डॉ. अनिल रॉय , बायोमेडिकल इंजिनिअर सुनील लोंढे व उपअभियंता सुनील बेळगावकर यांनी ठेकेदाराकडून बँक खात्यात पैशाच्या स्वरूपात लाच घेतली आहे.
त्यामुळे आयुक्त साहेब अशा निगरगट्ठ अधिकारी व कर्मचा-यांना तात्काळ निलंबित करा व त्यांची खाते निहाय चौकशी करा, असे या पत्रात वाघेरे यांनी म्हटले आहे.