न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- पिंपरी – चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढत आहेत. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आहेत. मागील काही दिवसात शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे . जुनअखेरपर्यंत तीन हजारापर्यंत रुग्ण होतील हा आयुक्तांचा अंदाज खरा होताना दिसून येत आहे . आजमितीला शहरातील रुग्णसंख्या 2274 वर जाऊन पोहोचली आहे.
त्या पार्श्वभुमीवर बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले , रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठीचा कालावधी 15 दिवसांचा राहिला. तर , जुलै अखेरपर्यंत साडेदहा हजार रुग्ण होतील. आता 14 दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. हा रेट राहिला तर , दहा हजारापर्यंत रुग्ण वाढ होईल . ‘
कंटेमेंट इम्प्रुव्ह ‘ झाले . तर , सात ते साडेसात हजारांपर्यंत रुग्ण वाढ होईल. कंटेन केले नाही. तर दहा हजारांपर्यंत रुग्ण संख्या वाढू शकते. पण, सक्रिय रुग्णांची संख्या कमी असेल. तीन ते साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण असतील.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे . 55 ते 60 टक्के त्याचे प्रमाण आहे. सर्वाधिक रुग्णवाढ पिंपरी भागातील जुन्या झोपडपट्यांमध्ये होत आहे. दापोडी , नेहरुनगर , विठ्ठलनगर , भाटनगर , बौद्धनगर , आनंदनगर , साईबाबानगर , अजंठानगर या भागात मागील दोन दिवसातील रुग्ण वाढ आहे. मिलिंदनगर , वेतळनगरमध्येही रुग्ण सापडले आहेत . पण, मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला नाही.
विठ्ठलनगरमध्ये एका इमारतीत जास्त रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसात रुग्णांचा आकडा 45 वर गेला आहे. अजंठानगरमध्ये 200, आनंदनगरमध्येही 200 हून अधिक रुग्ण सापडले आहेत.