न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 30. जून. 2020) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमके कुठल्या विषयावर बोलणार याविषयी प्रचंड उत्सुक्ता आहे.
एकाबाजूला पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत-चीनमधील तणाव सर्वोच्च पातळीवर आहे तसेच दुसऱ्या बाजूला दररोज देशात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतेय तसेच देश अनलॉक २ च्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे.
या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमक्या कुठल्या विषयावर जनतेशी संवाद साधणार याबद्दल कुतूहल आहे. अनलॉक २ संदर्भात काल रात्रीच मार्गदर्शकतत्वे जारी झाली आहेत. करोना व्हायरसच्या या संकटकाळात मोदी सहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. काल रात्री टि्वटरवरुन पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या संबोधनाची माहिती दिली.