- सकारात्मक बाब… आज एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ०१ जुलै) रोजी २०१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात ११८ पुरूष ८३ महिलांचा समावेश आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील शितळानगर देहूरोड, पवनानगर मावळ, बीड, इंदापूर, सिंहगडरोड, चाकण, नांदेड, बोपोडी, मामुर्डी येथील पाच पुरुष व ६ महिलांना कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच आज शहरातील व बाहेरील एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३२३० वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ११९३ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ०४ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह ) आलेले रुग्ण लिंबोरेवस्ती दापोडी, लोंढे चाळ पिंपरीगांव, सिध्दार्थनगर दापोडी, पवारनगर सांगवी, इंदिरानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, घरकुल चिखली, ममतास्वीट कॉर्नर दिघी, काळभोरनगर चिंचवड, अजंठानगर, महात्मा फुलेनगर भोसरी, आकाशनगर दिघी, पाटीलनगर चिखली, कदमचाळ खराळवाडी, विश्वशांती कॉलनी पिंपळे सौदागर, मोहनगर चिंचवड, विठ्ठलनगर दापोडी, जोतीबानगर काळेवाडी, सहयोगनगर निगडी, संभाजीनगर, बजरंगनगर खराळवाडी, किवळे, निगडी प्राधिकरण, गुळवेवस्ती भोसरी, चिंचवडेनगर, दळवीचाळ नेहरुनगर, शनिमंदिर वाय.सी.एम., महिंद्रा पिंपरी, समर्थनगर सांगवी, यमुनानगर निगडी, गांधीनगर पिंपरी, विठ्ठलनगर भोसरी, दत्तनगर चिंचवड, श्रध्दा गार्डन काळेवाडी, संततुकारामनगर पिंपरी, वडमुखवाडी, भारतमातानगर दिघी, आदित्यबिर्ला हॉस्पीटल, मिलिंदनगर पिंपरी, वैभवनगर पिंपरी, सेंट असला स्कुल आकुर्डी, हॉलमार्क रावेत, रहाटणी, च-होली, भोसरी, शाहूनगर चिंचवड, त्रिवेनीनगर तळवडे, सेक्टर २८ निगडी, चौधरीपार्क दिघी, दळवीनगर चिंचवड, एल.आय.सी.ऑफिस आकुर्डी, गणेशनगर बोपखेल, शिवतेजनगर चिखली, केशवनगर चिखली, विनोदेनगर वाकड, बौध्दनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, मधुबन सोसायटी पिंपरी, आकुर्डी, शितल रेसिडन्सी पिंपरी, वाकडकर वस्ती वाकड, प्रेमलोक चिंचवड, जवळकर बिल्डींग कासारवाडी, भोईआळी चिंचवड, लांडेवाडी भोसरी, साईकुंज कासारवाडी, तनिष्क च-होली, शास्त्रीचौक भोसरी, आनंदतरंग च-होली, वैशालीनगर पिंपरी, आदर्शनगर दिघी, बापदेवनगर देहूरोड, नढेनगर काळेवाडी, आदर्शनगर काळेवाडी, कृष्णानगर, ताम्हाणेवस्ती चिखली, भिमशक्तीनगर, बौध्दनगर निगडी, मोरेवस्ती चिखली, राजीव गांधी वसाहत नेहरुनगर तुपेचाळ दापोडी, नाटेकरचाळ नेहरुनगर गवळीमाथा, वाल्हेकरवाडी येथील रहिवासी आहेत.
आज केशवनगर चिंचवड, प्रभातनगर पिंपळेगुरव, अजंठानगर, भाटनगर, हनुमान मंदिर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, आंबेडकर कॉलनी पिंपरी, समर्थनगर सांगवी, दत्तनगर वाकड, आनंदनगर चिंचवड, संत गजानन महाराज नगर दिघी, वडमुखवाडी, शास्त्रीचौक भोसरी, मोरयापार्क पिंपळेगुरव, सी.एम.ई.गेट दापोडी, इंदिरानगर चिंचवड, मुंजोबा वसाहत चिंचवड, ट्रफिक पोलीस ऑफिस भोसरी, डांगेचौक थेरगांव, महेंद्रा नेहरुनगर, श्रीनगर थेरगांव, सुखवाणी आकुर्डी, कोकणेनगर काळेवाडी, नक्षत्रम चिंचवड, शुभश्री आकुर्डी, रमाबाईनगर पिंपरी, जयभीमनगर दापोडी, नानेकरचाळ पिंपरी, तापकिरमळा चौक काळेवाडी, मोरेवस्ती चिखली, मोहननगर, विठ्ठलनगर नेहरुनगर सुदर्शननगर पिंपळेगुरव, सिध्दार्थनगर दापोडी, साईचौक सांगवी, आदर्शनगर काळेवाडी, संततुकारामनगर भोसरी, यमुनानगर निगडी, सिध्दिविनायक कॉलनी रहाटणी, जगताप डेअरी पिंपळे निलख, कैलासनगर थेरगांव, सुर्यदर्शन सोसायटी इंद्रायणीनगर, लक्ष्मीनगर पिंपळेगुरव, पवारवस्ती दापोडी, बिजलीनगर, निराधारनगर पिंपरी, मोरवाडी, तुळजाई कॉलनी थेरगांव, विठ्ठलमंदिर बोपखेल, नाशिकफाटा कासारवाडी, प्रेरणास्कुल थेरगांव, माळवाडी देहूगांव, रास्तापेठ, शिरुर येथील रहिवासी असलेले कोविड १९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा.