न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै. २०२०) :- दरवर्षी लाखो भाविक आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे वारकर्यांची आषाढी वारी चुकली असली तरी या वर्षीच्या वारीची आठवण म्हणून ‘ हरितवारी-आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे शहरामध्ये विविध ठिकाणी दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
पक्षाध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या आवाहनानुसार आज आषाढी एकादशी निमित्त प्रभाग क्र. १२ मधील ज्योतिबानगर येथे ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रविण भालेकर, पंकज भालेकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे व प्रभागातील नागरीकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.