न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०२. जुलै. २०२०) :- इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एकाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. १) सकाळी वाकड येथे घडली.
मयूर दाभाडे (३४, रा. युरो स्कूलजवळ, वाकड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. वाकड पोलिस तपास करीत आहेत.