न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ३१ गावांमध्ये वर्षाविहार पर्यटनास बंदी आदेशाचा भंग करणा-यावर कडक कारवाई करण्याचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी पोलिसांना आदेश दिले. अनेकवेळा बंदी आदेश असतानाही पर्यटक जीव धोक्यात घालुन वर्षाविहाराचा आनंद लुटतात. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील धरण परिसरात पर्यटनास बंदी घातली आहे.
शनिवारी व रविवारी पर्यटकांनी घुसखोरी करू नये यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. तरीदेखील छुप्या मार्गाने पर्यटक येऊ लागले आहेत. गेल्या दहा दिवसात पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत. कडक कारवाईचे आदेश प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी आदेश काढले असून तहसीलदार मधुसुदन बर्गे व सर्व पोलिस निरीक्षकांना त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मावळात या ३१ ठिकाणी बंदी…
वडेश्वर, टाकवे बुद्रुक, फळणे, माऊ , नागाथली , वहाणगाव , कुसवली , बोरवली , डाहूली , सावळा , कुसुर , निळशी , खांउ , राजमाची , फनसराई , उधेवाडी , पवनाधरण व भुशी धरण परिसर , तुंगार्ली धरण , राजमाची व मंकी पॉईट खंडाळा , घुबड तलाव व डुक्स नोज कुरवंटे , घोरवडेश्वर ठोंगर , एकविरा देवी , कार्ला लेणी , भाजे लेणी , भाजे धबधबा , लोहगड , विसापूर, तुंग-तिकोना किल्ले , आंबेगाव धबधबा , दुधीवरे येथील प्रती पंढरपूर लोणावळा येथील टायगर , लायन्स , शिवलींग पॉईंट आदी ठिकाणी वर्षाविहार व पर्यटनास बंदी घातली आहे.