- यापुढे असा प्रकार निदर्शनास आल्यास मनसे स्टाईलने उत्तर देणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- चिंचवडच्या मोहननगर येथील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या जेवणात माश्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो. यापुढे असा प्रकार निदर्शनास आल्यास खपवून घेतले जाणार नाही. पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी शहर मनसेने आयुक्ताकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काही रुग्णालये कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी निवडलेली आहेत. त्यातीलच एक मोहननगर. येथील ईएसआयसी हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जेवणात माश्या व आळ्या आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचे नागरिकांचे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाने लक्ष घालून या गोष्टीना आळा घालावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने उत्तर देईल, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शहर मनसेचे उप शहराध्यक्ष विशाल मानकरी, शहरसचिव राहुल जाधव, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरसे यांनी म्हटले आहे.












