न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सुभाष इंगळे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘उपायुक्त’पदी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे.
त्यांची बदली २९ जून रोजी झाली होती. मंगळवारी (दि. ७) ते महापालिकेत रुजू झाले आहेत. इंगळे हे पालिकेचे पहिले ‘उपायुक्त’ असणार आहेत.कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व निकड विचारात घेऊन आणि त्याबाबतच्या उपायोजनांचा भाग म्हणून त्यांची पालिकेत बदली केली असल्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी आदेशात म्हटले आहे.
शिवाय सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास गावडे आणि सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी चेतना केरुरे यांची प्रशासन अधिकारी म्हणून पालिकेत प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे.