न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जुलै. २०२०) :- चिखली येथील एका कंपनीतून चोरट्यांनी पिस्तूल आणि रोकड असा ३७ हजारांचा ऐवज लंपास केला. ८ ते ९ जुलैदरम्यान कुदळवाडी येथील क्रिएटिव्ह इंजिनिअर कंपनीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी नुरमोहंमद यासिम चौधरी (रा. मोरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ते व्यापारी असल्याने त्यांनी सुरक्षिततेसाठी पिस्तुलचा परवाना घेतला होता. दरम्यान, ८ ते ९ जुलै या काळात चोरट्यांनी दहा हजारांची रोकड आणि पिस्तूल असा ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला.















