न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (२२ नोव्हें) :- निगडी येथील सिटी प्राईड शाळेतील सई अनिरुध्द टोणगावकर या विद्यार्थिंनीने दुबई येथे आयोजित केलेल्या नृत्यस्पर्धेत तृतीय क्रमाकांचे पारितोषिक मिळवले आहे.
दुबई येथे दि. १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्यावतीने इंडियन परफॉर्मिंग आर्टसच्या ८ व्या ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ज्युनियर विभागात सईने सोलो डान्स सादर केला. सइला सुप्रियाज डान्स अॅकॅडमीच्या सुप्रिया धाईंजे यांनी मार्गदर्शन केले.