न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २१ जुलै) रोजी ५४० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात चिंचवड येथील ४२, ६५ वर्षीय असे दोन पुरुष, नेहरुनगरमधील ६५ वर्षीय महिला, भोसरीतील ३८ वर्षाचा युवक, ५६ वर्षीय पुरुष, संत तुकारामनगर मधील ६६ वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील ६३ वर्षीय पुरुष, पिंपरीतील ५१ आणि ५७ वर्षीय पुरुष, सांगवीतील ८४ वर्षीय वृद्ध, ५२ वर्षीय पुरुष, दिघीतील ७५ वर्षीय वृद्ध महिला, वल्लभनगरमधील ८० वर्षीय वृद्ध, काळेवाडीतील ७३ वर्षीय वृद्ध, दापोडीतील ७२ वर्षीय वृद्ध महिला, निगडी, यमुनानगर येथील ४२ वर्षीय पुरुष, ताथवडेतील ५८ वर्षीय महिला, कोथरुड येथील ८९ वर्षाची वृद्ध महिला, जांभेतील ३६ वर्षाचा युवक आणि जुन्नर येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १२२५३ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३१०७ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७८११ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.















