न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. जुलै. २०२०) :- पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची चार लाख ८८ हजार ८६५ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत एका मोबाइल धारकासह पेटीएम, नियरबाय कंपनी, विकसिल्वर, अमेझान इंडिया, मोबिक्वीक कंपनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भेळ चौक, प्राधिकरण निगडी येथे घडली आहे.
संजय कानमल जैन (वय ४४, रा. भेळ चौक, प्राधिकरण) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. २२) याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.