न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. जुलै. २०२०) :- स्मार्ट सिटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्याकडे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यशदाच्या उपमहासंचालक नयना मुंडे यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून पीएमपीचा अतिरिक्त पदभार होता.
जगताप हे २०१२ पासून राज्य शासन सेवेत प्रतिनियुक्तीवर आले आहेत. ते भारतीय संरक्षण संपदा सेवा विभागातील अधिकारी आहेत. त्यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. स्मार्ट सिटीतून त्यांची बदली झाल्यानंतर ते सुमारे आठ महिने नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.