न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज मर्यादित ठेवण्यात आले आहे. या न्यायालयात सध्या एकाच न्यायाधीशांकडून काम चालते. या न्यायालयातील सर्व न्यायाधीशांचे कामकाज सुरू व्हावे, अशी मागणी अॅड. अतुल अडसरे यांनी केली आहे. अडसरे हे पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.
शहरात दिवाणी व फौजदारी खटल्यांचा ताण वाढत आहे. शहराच्या जवळील खेड आणि वडगाव – मावळ या न्यायालयात सर्व कोर्टाचे कामकाज चालते, तेथे व सर्व कोर्टातील न्यायाधीश येऊन कामकाज करतात. सर्व न्यायालयांचे कामकाज सुरु असल्याने अशिलांची न्यायालयीन कामे जलदगतीने होतात. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या या न्यायालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर एकाच न्यायालयाचे कामकाज सुरु असल्याने इतर खटल्यांना उशीर चि होतो. शहराची लोकसंख्या २५ लाखांवर पोहोचली आहे. त्यात दररोज खटले येत आहेत, याचा विचार करून येथील सर्व कोर्ट सुरू करण्यात यावेत, अशी मागणी अॅड अडसरे यांनी केली आहे.