- भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणवासियांना घरी जाण्याकरिता प्रशासनाने प्राधान्याने विशेष पास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका व पोलीस प्रशासनाला या मागणीचे निवेदन दिले आहे.
पिंपरी – चिंचवड ही औद्योगिकनगरी असून, रोजगार मिळाल्यानंतर हजारो कोकणवासीय शहर व उपनगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. या ठिकाणाहून दिवाळी, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावी जाणाऱ्या कष्टकऱ्यांची संख्या मोठी आहे.
गणेशोत्सव आणि गौराईपूजन या धार्मिक सणांचे महत्व लक्षात घेता, या सर्व गणेशभक्तांना कोकणात जाण्याकरिता विशेष पास प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


















