न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२०) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पिपरी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे भव्य असा महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याचा पुर्णकृती पुतळा उभारणे व फुले सृष्टी उभारणे या कामाचे सादरीकरण स्थायी समिती सभागृहात दिनांक ४/८/२०२० रोजी प्रकल्पाचे सल्लागार मे गिरीष चिद्दरवार यांनी सादर केले.
अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या. सादरीकरणाच्या वेळी सभापती, स्थायी समिती, संतोष (अण्णा) लोंढे, माजी महापौर वैशाली घोडेकर, अनिता फरांदे, नगरसेविका माधवी राजापुरे, रेखा दर्शले, सुवर्णा बुर्डे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सामाजीक कार्यकर्ते मानव काबळे, समनवय समिती अध्यक्ष योगेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते संतोष जोगदड. गिरिष वाघमारे, हनुमंत माळी, अनिल साळूके, चंद्रशेखर भुजबळ, आनंदा कुदळे, विशाल जाधव, निलेश डोके, पी के महाजन, सुरेश गायकवाड कार्यकर्ते व या विषयातील अभ्यासू लोक उपस्थित होते.
यावेळी स्मारक व पुतळा उभारणी संदर्भात शासनमान्य पुस्तकाचा आधार घेण्यात यावा, तसेच म्युरलस बाबतीत आवश्यक त्या सूचना उपस्थितांनी केल्या. चांगल्या सूचनाची दखल घेणेबाबत महापौर यांनी सूचना करून सदरचे स्मारक राज्यातील भव्यदिव्य व्हावे व माझ्या व स्थायी समिती अध्यक्ष सतोष लोंढे यांच्या कार्यकालात काम पुर्ण करावे, असा मनोदय व्यक्त केला.














