न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. ऑगस्ट. २०२०) :- राज्य शासनाच्या २९ जुलैच्या आदेशानुसार पिंपरी – चिंचवड महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे आता पालिकेत पूर्वीप्रमाणे सर्व विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसणार आहे.
शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पालिकेत सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहणे बंधनकारक केले होते. गर्भवती महिला, अवयव प्रत्यारोपण केलेले, केमोथेरपी, इम्युनोसप्रेसिव्हथेरपी घेत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून १८ सवलत आहे. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
तसेच, दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची सवलत आहे. जे दिव्यांग कर्मचारी स्वच्छेने उपस्थित इच्छुक असतील, त्यांना परवानगी दिली जाणार आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन वैद्यकीय, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत, सुरक्षा या अत्यावश्यक विभागातील कर्मचारी सोडून १० टक्के उपस्थिती करण्यात आली होती. तो आदेश रद्द करण्यात आला आहे.