न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२०) :- जिल्हाधिकाऱ्यांचे नियम झुगारून आणि पोलिसांची नजर चुकवून काही पर्यटक लोणावळा येथील सहारा ब्रिज येथे मौजमजेसाठी आले होते, त्यातील एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हवेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. या प्रकरणी सागर मोहन भूमकर याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, ज्या पिस्तूलातून हवेत गोळीबार करण्यात आला, ते पिस्तुल देखील लोणावळा पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्य आरोपी सागर मोहन भूमकर (वय-३५), संदीप हनुमंत जाधव (वय- ३६), सचिन बाळासाहेब भूमकर (वय- ३५), सचिन साहेबराव मांदळे (वय- ३८)अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी माणिक विलास अहिनवे यांनी लोणावळा पोलिसात फिर्याद दिली आहे.











