न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ०९ ऑगस्ट) रोजी १०९२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात चिंचवड (पुरुष ६५ वर्षे), चिखली (पुरुष ८० वर्षे), किवळे (पुरुष ६१ वर्षे), काळेवाडी (स्त्री ४७ वर्षे), भोसरी (पुरुष ७७ वर्षे), खराळवाडी (पुरुष ५१ वर्षे), देहुरोड (स्त्री ४७ वर्षे), कात्रज (स्त्री ४४ वर्षे), चाकण (स्त्री ३५ वर्षे), बिबेवाडी (स्त्री ६३ वर्षे), दौंड (पुरुष ६४ वर्षे), चाकण (पुरुष ७० वर्षे), जळगांव (पुरुष ६४ वर्षे), तसेच पुणे म.न.पा.हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण (पुरुष ६८ वर्षे), चिखली (पुरुष ५१ वर्षे), चिंचवड (पुरुष ८४ वर्षे), बोपखेल (पुरुष ७८ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २९१९७ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ४८७१ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ४८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २०२६४ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.