न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) रोजी १०५२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात भोसरी (पुरुष ६० वर्षे, पुरुष २९ वर्षीय पुरुष), रहाटणी (स्त्री ७० वर्षे), आकुर्डी (पुरुष ५१ वर्षे), थेरगाव (स्त्री ६४ वर्षे, पुरुष ७० वर्षे, पुरुष ३२ वर्षे), कासारवाडी (पुरुष ६६ वर्षे), मोरेवस्ती चिखली (स्त्री ८० वर्षे), निगडी प्राधिकरण (स्त्री ८९ वर्षे), जाधववाडी चिखली (पुरुष ६५ वर्षे), नेहरुनगर पिंपरी (स्त्री ७५ वर्षे), च-होली फाटा (पुरुष ८१ वर्षे), चिंचवड (पुरुष ७० वर्षे), काळेवाडी (पुरुष ७२ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३१६४३ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ६१३० रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ५२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २२००५ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.














