न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट. २०२०) :- तुझ्या लग्नात घरच्यांनी काही दिले नाही, असे माहेरच्यांबाबत अपमानास्पद बोलून आरोपी यांनी विवाहितेला त्रास दिला. तसेच हडपसर येथील प्लॉटवर घर बांधायचे असून त्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, असा आरोपी यांनी तगादा लावला. या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी (दि. १०) सकाळी आत्महत्या केली.
सुजाता ऊर्फ आरोही अभिजित गायकवाड (वय २३, रा. काशिदनगर, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अशोक निवृत्ती कांबळे (वय ५२, रा. देगाव रोड, सोलापूर) यांनी मंगळवारी (दि.११) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अभिजित गुंडू गायकवाड, गुंडू शंकर गायकवाड, शारदा गुंडू गायकवाड, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दीपा आणि मेघा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.














