न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट. २०२०) :- राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे.
त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यासाठी २५०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जात होते. अशा वेळी आता वैयक्तिकरित्या तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारण्याचे आदेश खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.














