न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट. २०२०) :- कोरोनाची पार्श्वभूमी बघता दरवर्षीप्रमाणे साजरी करणारी दहीहंडी सरकारी नियम पाळत रद्द करून, श्रद्धा गार्डन सांस्कृतिक मित्र मंडळाने बिजलीनगर येथील नचिकेत बालग्राम आश्रमास अन्नदान केले.
यात तांदूळ ५० किलो, डाळ ३० किलो, गहू ५० किलो, चहा पावडर ४ किलो, साखर ३० किलो, बिस्कीट १०० पुडे, मसाला मिक्स ३ किलो या वस्तूंचा समावेश आहे. ही मदत वस्तुस्वरूपात श्रद्धा गार्डन सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष आशिष मोरेश्वर गावडे यांनी नचिकेत बालग्रामचे अध्यक्ष डॉ. भागचंद ब्रम्हेचा यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.














