न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हें) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मिळकतींना मालमत्ताकराची आकारणी केली जाते. कर संकलन विभागाकडून कर आकारणीचे काम केले जाते. मिळकतकराची १०० टक्के वसूली करण्याचा सरकारचा आदेश आहे. २७ डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी अवैध बांधकामांचा शास्तीकर वगळता निव्वळ वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत निर्देश दिले होते.
तथापि, २०१७ -१८ या आर्थिक वर्षात कर आकारणी आणि कर संकलन विभागातील ८२ मुख्य लिपीक, लिपीकांनी ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत नव्वद टक्के वसुलीचे उदिष्ट पूर्ण केले नाही. त्यामुळे या कर्मचा-यांना कर संकलन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजविली होती. कर्मचा-यांकडून खुलासा मागविला होता. परंतु, खुलासा संयुक्तिक नव्हता त्यामुळे ८२ मुख्यलिपिक, लिपीकांवर २५० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. या कारवाईची नोंद लिपिकांच्या सेवा पुस्तकात केली जाणार असल्याचे महापालीकेकडून कळविण्यात आले आहे.
















