न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०):- आपसात संगनमत करून मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असताना तिचा आरोपीशी विवाह लावला. आरोपींनी बालविवाहास प्रोत्साहन देऊन विवाह घडवून आणला. हा प्रकार ९ जून रोजी सायंकाळी साडेसह वाजता तिरुपती चौक, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला.
सुरज सुखलाल काळे (वय १९, लांडगेवस्ती, भोसरी) असे बालविवाह करणा-या पतीचे नाव आहे. त्याच्यासह आशिष हकीकत भोसले (वय ३०), कारली आशिष भोसले (वय ३५, दोघे रा. शांतीनगर, भोसरी), तीरला सुखलाल काळे (वय ४०), सुखलाल मोतीलाल काळे (वय ५०, दोघे रा. लांडगेवस्ती, भोसरी) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी पोलीस तपास करीत आहेत.











